Wednesday 27 March 2013

"सरी ही येईना"


Sometimes we feel that we are alone but i feel we are never alone because; whenever we are alone we can meet our self more closely :)
   

"सरी ही येईना"

मनाचे धागे 
मना बांधता येईना
दुभंगलेल्या भिंतीगत  
मने जुळता जुळेना ........

ओढ जुनीच तरीही
मना कुठेच रुजेना
खूप खुलवे वाटते
काही केल्या हे खुलेना ........

जवळ आल्यागत भासे
अंतर तरीही वाढते
एकट्या मनाला या माझया
हाक कोणाची मिळेना ........

मागे वळून पहावे
कोणाकडे या मानाने

दूरवर गेले सारे
पाऊलखुणा ही दिसेना ........

आता मन हे एकटे
सारे आभाळ दाटके
मन डोळ्यातून वाहे
पण सरी ही येईना ........

Trups Forever
25/03/2013
7:45 AM