Saturday 11 May 2013

"अबोल सांझा"

"सरी राधा श्याम"

(I was sitting in the window and it was raining outside...
This poem is my sweet imagination while watching first rain of 2013 alone)

राधा आली सरी होऊनि
थुई थुई नाचत अंगणी,
श्याम वाजविता बासरी
रिम झिम आली सरी ....

बेधुन्द राधा रंग रंगली
प्रेमात गंध गंधली,
सर सरत्या सरित
राधा प्रेम वत्सल दंगली ....

नकळत पाहता पाहून हसता
हरपून गेले भान,
सूर ताल आणी प्रियेत त्याच्या
मोहित झाला श्याम .....

मेघांनी मग गर्दी केली
मिठीत राधा श्‍याम,
हात हाती अन् बिलगुण राधा 
हरवून गेली भान .....

सरित कळले सरित जुळले
बेभान राधा-श्याम,
श्याम दिसे राधाला अन् 
राधामध्ये श्याम .....
 
-तृप्ती
1-मे-2013 07.30 pm